राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजपक्षे विजयी

Posted on Thursday, January 28, 2010 by maaybhumi desk

कोलंबो
राष्ट्राध्यक्षपदासाठी श्रीलंकेत घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांचा विजय झाल्याने सलग दुसऱ्यांदा ते आता श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. 18 लाख मतांनी ते निवडून आले असून, याची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात करण्यात येणार असल्याचे श्रीलंकेतील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
श्रीलंकन सैन्याच्या प्रमुख पदाचा राजीनामा देत फोन्सेका यांनी राजपक्षे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता.
लिट्टेचा खात्मा करण्यात आपली महत्त्वाची भूमिका असल्याचा फोन्सेकांचा दावा होता. त्यांच्या या दाव्याचा वापर विरोधीपक्षांनी करुन घेत त्यांना राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली होती.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजपक्षे विजयी"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner