अमृता सुभाष स्पॅगेटी २४-७ मध्ये
Posted on Thursday, January 28, 2010 by maaybhumi desk
श्वास, विहिर यासारख्या चित्रपटातील आणि अवघाची संसार या गाजलेल्या मालिकेतील अभिनेत्री अमृता सुभाष आता हिंदीत नायिका म्हणून पदार्पण करते आहे. स्पॅगेटी २४-७ या चित्रपटात ती मिमोह चक्रवर्तीची नायिका म्हणून दिसेल. चारशे मुलींच्या ऑडिशनमधून अमृताची निवड झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौरव पांडे यांनी केले आहे. या चित्रपटात मिमोहचे वडिल मिथून चक्रवर्तीही आहेत.
अमृताचे गुरू सत्यदेव दुबे यांनी अमृताला गौरव पांडे यांच्याकडे पाठवले. पांडे यांन तिची ऑडिशन घेतली आणि त्यानंतरच तिची निवड केली. आता चित्रपटात व्यस्त राहिल्यामुळे मालिका कमी करणार असल्याचे अमृता म्हणते. मात्र, त्याता काम करणे एकदमच बंद करणार नाही, असेही तिने सांगितले.

Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "अमृता सुभाष स्पॅगेटी २४-७ मध्ये"
Post a Comment