अॅपलचा आयपॅड टॅब्लेट सादर
सॅन फ्रान्सिस्को
अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टिव्ह जॉब्स यांनी बुधवारी 'आयपॅड' हा टॅब्लेट स्टाईल कम्प्युटर सादर केला. आयफोनशी साधर्म्य साधणारा हा कम्प्युटर-फोन त्यापेक्षा थोडा मोठा आहे.
शाळेतल्या पाटीसारखा दिसणारा या कम्प्युटरमध्ये माऊस व कि बोर्ड नाही. त्याला टच स्क्रिन आहे. शिवाय वायरलेसही आहे. लॅपटॉपसारखाच असणारा हा कम्प्युटर स्मार्टफोनपेक्षाही जास्त क्षमता राखणारा आहे, असे जॉब्स म्हणाले. या आयपॅडद्वारे नेटचा वापरही करता येतो. अॅपलच्याच सफारी या ब्राऊझरद्वारे जॉब्स यांनी एक ई मेल टाईप करून दाखवला. पुस्तके वाचण्यासाठी, गेम्स खेळण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकेल.
अॅपल या आयपॅडसाठी फोनवरून नेटचा वापर करणार्या ग्राहकावर लक्ष केंद्रीत करणार आहे. कारण यात फोन, कम्प्युटर, नेट या सगळ्या सुविधा आहेत. शिवाय टिव्हीही पहाता येतो.
या फोनची किंमत किती हे मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आले.
*एक गेगा हर्ट्ज (1 जीएच) एप्पल प्रोसेसर
*16-64 जीबी फ्लॅश मेमरी
* 0.5 इंच (1.25 सेमी) जाडी
*वजन 1.5 पौंड (0.7 किलोग्रॅम)
*वाय-फाय व 3जी कनेक्टिविटी
No Response to "अॅपलचा आयपॅड टॅब्लेट सादर"
Post a Comment