रॅगिंगला कंटाळून फर्ग्युसनच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
पुणे
येथील फर्ग्युसन विधी महाविद्यालयातील प्रशांत चितळकर या 22 वर्षीय विद्यार्थ्याने वरीष्ठ विद्यार्थ्यांकडून घेतल्या जात असलेल्या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या विद्यार्थ्याने 15 दिवसांपूर्वीही अशा प्रकाराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
प्रशांत अहमदनगर येथील रहिवासी असून तो कायद्याच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आहे. त्याच्या कुटुंबीयांनी या संदर्भात नऊ विद्यार्थ्यांविरोधात नगरच्या राहुरी पोलीस सटेशनला तक्रार दाखल केली आहे. प्रशांत या रॅगिंगने अतिशय तणावात होता आणि त्याने त्यामुळे 15 दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्याच्यावर वेळीच उपचार करण्यात आल्याने त्याला वाचवण्यात यश आले होते.
दरम्यान, महाविद्यालय प्रशासनाने या संदर्भात आपल्याकडे कुठलीही तक्रार आली नसल्याचा दावा केला असून या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे जाहीर केले आहे.

No Response to "रॅगिंगला कंटाळून फर्ग्युसनच्या विद्यार्थ्याची आत्महत्या"
Post a Comment