श्रीलंका निवडणुकीत राजपक्षे आघाडीवर

Posted on Wednesday, January 27, 2010 by maaybhumi desk

कोलंबो

श्रीलंकेत राष्ट्राध्‍यक्षपदासाठी झालेल्‍या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून पहिल्‍या टप्‍प्‍यात विद्यमान राष्‍ट्राध्‍यक्ष महिंदा राजपक्षे यांनी आपले प्रतिस्‍पर्धी उमेदवार माजी सैन्‍य प्रमुख शरत फोन्सेका यांच्‍यापेक्षा आघाडी घेतली आहे.
स्थानिक माध्‍यमांनी या संदर्भात दिलेल्‍या माहितीनुसार राष्ट्राध्‍यक्ष राजपक्षे यांना आतापर्यत झालेल्‍या मतमोजणीत 59.57 टक्के मते मिळाली असून जनरल फोन्सेका यांना 38.65 टक्के मते मिळाली आहेत.

आतापर्यंत 39 निकालांची घोषणा कण्‍यात आली असून त्‍यापैकी 32 निकाल राजपक्षेंच्‍या खात्यात गेले आहेत.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "श्रीलंका निवडणुकीत राजपक्षे आघाडीवर"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner