इथोपियन विमानाचा ब्लॅक बॉक्स व 32 मृतदेह सापडले
बेरूत
 बेरूतमधून सोमवारी उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच समुद्रात पडलेले इथोपियन एअरलाइन्सच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून मंगळवारी आणखी दोन मृतदेह आढळून आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत सापडलेल्या मृतांची संख्या 32 झाली आहे. या विमानात 90 प्रवासी होते.

या विमानात असलेल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे.
लेबनानी माध्यमांनी या संदर्भात दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकन बचाव पथकाने अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून ब्लॅक बॉक्सचा शोध घेण्यात यश मिळवले असून समुद्रात सुमारे 500 मीटर खोल पडलेल्या ब्लॅक बॉक्सला बुधवारी काढण्यात आले आहेत. 
अपघातानंतर बचाव पथक भूमध्य सागरात सातत्याने काम करीत असून प्रवाशांच्या मृतदेहांसह विमानाचे तुकडे आणि सामान पथकाला मिळाला आहे. 
विमानाच्या अपघाताचे स्पष्ट कारण अद्यापही समजू शकले नसले तरीही उड्डाणानंतर काही वेळातच खराब हवामान आणि दाट धुक्यामुळे विमानाचा संपर्क खंडित झाला होता.

No Response to "इथोपियन विमानाचा ब्लॅक बॉक्स व 32 मृतदेह सापडले"
Post a Comment