लालचौकात तिरंगा फडकलाच नाही!
Posted on Wednesday, January 27, 2010 by maaybhumi desk
श्रीनगर
श्रीनगरच्या लाल चौकात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तिरंगा फडकवण्यात आला नसून तेथे कुठलाही उत्साह दिसून आलेला नाही. गेल्या 19 वर्षांपासून 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला येथे तिरंगा फडकवला जात असतो.
राज्याच्या या सर्वांत मोठ्या व्यापारी केंद्रावर प्रजासत्ताक दिनी, मंगळवारी मोठ्या प्रमाणावर शांतता दिसून आली. 
फुटीरवादी संघटनांकडून करण्यात आलेल्या बंदच्या आवाहनानंतर आणि मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनातीमुळे लोक घराबाहेर पडलेच नाहीत. परिणामी येथे तिरंगा फडकू शकलेला नाही.
लाल चौकात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कुठलेही आयोजन न करण्याबाबतचे अधिकृत कारण अद्याप सरकारने स्पष्ट केले नसले तरीही राष्ट्रध्वज फडकवला जाणे आवश्यक होते. अशा भावना स्थानिक लोकांमधून व्यक्त होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
 
 

No Response to "लालचौकात तिरंगा फडकलाच नाही!"
Post a Comment