व्यक्तीद्वेषात ऑस्ट्रेलियन आघाडीवर
Posted on Saturday, January 30, 2010 by maaybhumi desk
मेलबोर्न
ऑस्ट्रेलियन माणूस षडरिपुंच्या पूर्णतः आहारी गेला असून क्रिकेट जगतातील महान फलंदाज डॉन ब्रॅडमन आणि संगीत जगतातील सनसनी कायली मिनोग यांचा देश ऑस्ट्रेलिया जगातील सर्वांत वाईट लोकांचा देश असल्याचे एका निष्कर्षातून समोर आले आहे. एका संशोधनानुसार व्यक्तीद्वेषात ऑस्ट्रेलियातील लोक सर्वांत आघाडीवर आहेत. ऑस्ट्रेलियन माणूस काम, लोभ, आळस, क्रोध, ईर्ष्या आणि अहंकाराचा पुतळा असून इतरांच्या प्रगतीची ईर्ष्या बाळगण्यातही ते आघाडीवर असतात.
बीबीसीच्या 'फोकस' या नियतकालिकानुसार ब्रिटनच्या काही संशोधकांनी ही असा निष्कर्ष काढला आहे, की जगात आढळणा-या सात प्रकारच्या पापांचा शिरकाव सर्वांधिक ऑस्ट्रेलियन माणसात आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "व्यक्तीद्वेषात ऑस्ट्रेलियन आघाडीवर"
Post a Comment