मताधिकार हवायं ना मग बुरखा काढाः न्यायालय
Posted on Saturday, January 23, 2010 by maaybhumi desk
नवी दिल्ली
मतदार ओळखपत्रासाठी फोटो काढताना मुस्लिम बुरखाधारी महिलांना चेह-यावरील पडदा दूर करावाच लागेल हे त्यांना मान्य नसल्यास त्यांना ओळखपत्र देऊ नका, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात सुनावणी करताना सांगितले, की धार्मिक भावनांच्या नावावर मतदार ओळखपत्र फोटो कार्डचा विरोध केला जाऊ शकत नाही. धार्मिक भावना घटनात्मक नियमांपेक्षा महत्वाच्या नाहीत. जर महिलांना बुरखा दूर करणे मान्य नसेल तर त्यांनी मतदानाच्या हक्कापासून दूर राहण्यास तयार रहावे लागेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "मताधिकार हवायं ना मग बुरखा काढाः न्यायालय"
Post a Comment