निवडणूक आयोगाच्‍या हीरक महोत्सवास सुरूवात

Posted on Monday, January 25, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली

भारतीय लोकशाही पध्‍दतीला आणि निवडणूक आयोगाला साठ वर्ष पूर्ण झाल्‍याबद्दल सोमवारपासून हीरक महोत्‍सवाला सुरूवात होणार असून या समारंभाचे उदघाटन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्‍या हस्‍ते केले जाणार आहे. यावेळी प्रमुख राजकीय नेत्यांशिवाय 30 देशांचे निवडणूक आयोग प्रमुखही उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास उपराष्ट्रपती हामिद अंसारी, पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह, लोकसभाध्यक्षा मीरा कुमार आणि विरोधी पक्ष नेत्‍या सुषमा स्वराज उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमासाठी सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना आमंत्रित करण्‍यात आले असून जगभरातील 30 देशांच्‍या निर्वाचन आयोग प्रमुखांचा त्यात समावेश आहे. या समारंभात अमेरिका, रशिया, कॅनडा, ब्राझील, नायजेरिया, व्‍हेनेज्‍युएला, जपान, इंडोनेशिया आणि बांग्लादेशचे निवडणूक आयुक्त उपस्थित राहणार आहेत.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "निवडणूक आयोगाच्‍या हीरक महोत्सवास सुरूवात"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner