मराठी चित्रपट दाखवा अन्यथा लायसन्स रद्द!
मल्टिप्लेक्सचालकांना इशारा
मल्टिप्लेक्सेसमध्ये वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट न दाखविल्यास आता त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला आहे. आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनासंदर्भात निर्माते व मल्टिप्लेक्स मालकांची समिती बनविण्याचा निर्णय झाला.
शासनाच्या १९६८ च्या नियमानुसार प्रत्येक मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांना वर्षातील चार आठवडे किंवा ११२ शो मराठी चित्रपटांचे दाखवले पाहिजेत.
मल्टिप्लेक्समधील एक स्क्रीन मराठी चित्रपटांसाठी आरक्षित ठेवायला हवा. पण मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत, असे कारण दाखवून मल्टिप्लेक्सवाले मराठी चित्रपटच दाखवत नाही. यासंदर्भात मराठी चित्रपट महामंडळ सरकारकडे कठोर पावले उचलण्याची मागणी करत आहे.
या सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राम विच्चनी, उपाध्यक्ष नितिन दातार व गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
No Response to "मराठी चित्रपट दाखवा अन्यथा लायसन्स रद्द!"
Post a Comment