'आणखी युध्द सहन करणे भारताला अशक्य'
Posted on Friday, January 29, 2010 by maaybhumi desk
नवी दिल्ली
भारत-पाक चर्चा पुन्हा सुरू होण्याची गरज असून भारताने 26 नोव्हेंबरचया घटनेबाबत पाकला जबाबदार न धरता चर्चा सुरू ठेवली पाहिजे कारण पाकिस्तान प्रमाणेच भारतही आणखी युध्द सहन करू शकण्याच्या पातळीवर नाही, असे प्रतिपादन पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांनी केले आहे.मुंबईवर दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये बंद झालेल्या द्विपक्षीय चर्चेचा उल्लेख करून गिलानी म्हणाले, की 1.25 अब्ज लोकांना कुठल्याही एका घटनेसाठी जबाबदार धरता येणार नाही. जर आपण एखाद्या घटनेने संबंध तोडण्याचा प्रयत्न करणार असू तर त्याचा फायदा दहशतवाद्यांनाच होईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "'आणखी युध्द सहन करणे भारताला अशक्य'"
Post a Comment