नर्मदा खो-यात 'एलियन'चे वास्‍तव्‍य!

Posted on Sunday, January 31, 2010 by maaybhumi desk

होशंगाबाद

मध्‍यप्रदेशातील रायसेनपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावरील दाट जंगलात आढळून आलेल्‍या शैलचित्रांच्‍या आधारे नर्मदा नदीच्‍या खो-यात असलेल्‍या प्राचीन शैलचित्रांचा अभ्‍यास करीत असलेल्‍या एका संस्थेने दावा केला आहे, की या भागात पूर्वी परग्रहावरील प्राणी 'एलियन' आले आहेत. संस्थेने आदिमानव काळातील एका चित्राच्‍या आधारे हा निष्‍कर्ष दिला असून या चित्रात उडत्‍या तबकडीचेही चित्र कोरण्‍यात आले आहे.


नर्मदा खो-यातील अतिप्राचीन ठिकाणांच्‍या शोधात आणि त्यांच्‍या अभ्‍यासात गुंतलेल्‍या सिड्रा आर्कियोलाजिकल एन्‍व्‍हॉयरन्मेंट रिसर्च, ट्राइब वेल्‍फेअर सोसायटीचे पुरातत्व तज्‍ज्ञ मोहम्मद वसीम खान यांनी या संदर्भात दिलेल्‍या माहितीनुसार ही कोरीव चित्रे रायसेन जिल्‍ह्यातील भरतीपूर आणि घना भागातील आदिवासी गावाच्‍या परिसरातील पहाडांमध्‍ये आढळले आहेत. यातील एका कोरीव चित्रात उडती तबकडी (यूएफओ) दाखवण्‍यात आली असून तिच्‍या शेजारी एक आकृती दर्शविण्‍यात आली आहे. तिचे डोके एलियन सारखे असल्‍याचे दिसत आहे.

संस्थेच्‍या दाव्‍यानुसार अश्‍वयुगातील मानव आपल्‍या आस-पास दिसणा-या गोष्‍टी दगडांवर आणि गुफांमध्‍ये कोरत असे. इतर चित्रांवरून तसे स्‍पष्‍ट जाणवत आहे. त्‍यामुळे त्याकाळातील मानवाने एलियन आणि उडती तबकडी पाहिल्‍यानंतरच असे चित्र बनवले असण्‍याची शक्यता अधिक आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "नर्मदा खो-यात 'एलियन'चे वास्‍तव्‍य!"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner