आमीरने खाल्ला 'येडा बनून पेढा'

Posted on Wednesday, April 28, 2010 by maaybhumi desk

Aamir
आमीर खान पक्का 'येडपट' (इडियट) असला तरी 'येडा बनून पेढा' खाण्यात त्याचा हात शाहरूखही धरू शकणार नाही. आता या इडियटने तिकडे थिएटरमध्ये धुमाकूळ घातला असताना आता जाहिरात जगतातही तो धुमाकूळ घालायला सज्ज झालाय. आखाती देशातली एटीस्लाट ही टेलिकॉम कंपनी भारतात येणार आहे. तिच्या जाहिरातीसाठी आमीरला तब्बल ३५ कोटी रूपये मिळणार आहेत. जाहिरात जगतात एवढी मोठी रक्कम मिळणारा तो पहिलाच कलावंत आहे.


हे 'डील' पूर्ण झाल्याचं कळतं. आमीर सध्या पार्ले, कोका कोला, टाटा स्काय आणि सॅमसंगची जाहिरात करतो आहे. आता त्यात एटिस्लाटची भर पडणार आहे. थ्री इडियटस जबरदस्त हिट झाल्याचा फायदा त्याला या जाहिरातीच्या डिलवेळी मिळाल्याचे बोलले  जाते. पण त्याच्या निकटस्थांच्या मते हे डिल यापूर्वीच झाले होते, फक्त ते जाहिर आत्ता झाले एवढेच.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "आमीरने खाल्ला 'येडा बनून पेढा'"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner