'अफगाणमध्ये भारताच्या वाढत्या प्रभावाने पाक चिंतित'
Posted on Wednesday, February 03, 2010 by maaybhumi desk
इस्लामाबाद
अफगाणिस्तानात भारताच्या वाढत्या प्रभावाबाबत आम्ही गंभीर असून अफगाणमध्ये भारताच्या कुठल्याही हस्तक्षेपाच्या पाक पूर्णपणे विरोधात आहे. कारण त्यांचा हा हस्तक्षेप पाकिस्तानच्या हितसंबंधांना धोकेदायक ठरू शकतो असे मत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चौधरी अहमद मुख्तार यांनी व्यक्त केले आहे.पाकिस्तानच्या दौ-यावर आलेल्या ब्रिटिश नौसेना प्रमुख एडमिरल सर मार्क स्टॅनहोप यांच्यासोबतच्या एका बैठकी दरम्यान मुख्तार यांनी वरील वक्तव्य केले आहे. दोन्ही देशाच्या नेत्यां दरम्यान दहशतवादा विरोधातील युद्ध, नौ सेनेतील सहकार्य आणि अफगाणिस्तानच्या सुरक्षे संदर्भात चर्चा झाली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "'अफगाणमध्ये भारताच्या वाढत्या प्रभावाने पाक चिंतित'"
Post a Comment