श्रीलंकन संसद विसर्जित, मुदतपूर्व निवडणुका
Posted on Wednesday, February 10, 2010 by maaybhumi desk
कोलंबो
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे उत्साहीत झालेल्या महिंदा राजपक्षे यांनी मंगळवारी श्रीलंकन संसद विसर्जित केली असून त्यामुळे मुदतपूर्व निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
राजपक्षे यांनी यापूर्वीच माजी सैन्य प्रमुख शरथ फोन्सेंका यांना अटक करून आपल्या विरोधकांना ताकीद दिली आहे.
रशिया दौ-यावरून परतताच त्यांनी संसद विसर्जित करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. त्यांनी देशात राष्ट्राध्यक्ष निवडणुकही दोन वर्षांपूर्वी केल्या आहेत. देशात 8 एप्रिल रोजी मतदान होण्याची शक्यता असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 19 ते 26 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. एकच सभागृह असलेल्या श्रीलंकन संसदेत 225 सदस्य आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "श्रीलंकन संसद विसर्जित, मुदतपूर्व निवडणुका"
Post a Comment