शाहरुख शिवसेनाप्रमुखांना भेटणार!
मुंबई
'माय नेम इज खान' हा चित्रपट सुरळीत प्रदर्शित करता यावा यासाठी सिने अभिनेता शाहरूख खान याने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुंबई पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे ही भेट होऊ शकली नसल्याची माहिती समोर आली आहे. आता या वादावर पडदा टाकावा यासाठी शाहरूख बाळासाहेबांना भेटणार असल्याचे त्याने अबुधाबीतून जाहीर केले आहे.
आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या सहभागाबद्दल वक्तव्य केल्यामुळे शिवसेनेचा रोष ओढवून घेतलेल्या शाहरूख खानने वाद मिटावा यासाठी बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्याची तयारी दर्शविली होती. मात्र शिवसैनिकांचा बंदोबस्त करण्यास आपण सक्षम असल्याचे सांगत सत्ताधारी कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या इशा-यावरून मुंबई पोलिसांनी किंग खानला भेटू दिले नसल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या निर्माता व दिग्दर्शक करण जौहर आणि शाहरुख चित्रपटाच्या प्रचारासाठी दुबईत असून शिवसेनेचा वाढता रोष पाहून शाहरूख परतल्यावर बाळासाहेबांची भेट घेऊन वादावर पडदा टाकण्यासाठी प्रयत्न करण्याची दाट शक्यता त्याच्या जवळच्या सुत्रांनी वर्तविली आहे.
No Response to "शाहरुख शिवसेनाप्रमुखांना भेटणार!"
Post a Comment