बुखारीचे आव्हान राहुलने स्वीकारले
नवी दिल्ली
कॉंग्रेस दहशतवादाच्या नावावर आजमगढच्या तरुणांना बदनाम करत असून राहुल गांधी यांनी आजमगढच्या युवकांच्या नावावर राजकारण करू नये, हिंमत असेल तर त्यांनी आजमगढला येऊन दाखवावे, असे आव्हान दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सैयद अहमद बुखारी यांनी दिले आहे. तर बुखारी यांचे हे आव्हान राहुल यांनी स्वीकारले आहे.
खालिसपूरमध्ये इंडियन मुजाहिदीनचा संशयित आरोपी शहजादच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर शाही इमाम म्हणाले, की राहुल दलितांच्या घरी जाण्याचे नाटक करीत असतात. बाटला हाउस चकमक कॉंग्रेस सरकारचा कट असल्याचे सांगून शहजादच्या अटकेची निंदा करताना मौलाना बुखारी यांनी राहुल यांना जर खरोखरच तरुणांबद्दल आस्था आहे. तर त्यांनी बाटला हाऊस प्रकरणातील एन्काऊंटर झालेल्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, बुखारी यांचे हे आव्हान राहुल गांधी यांनी स्वीकारले असून आपण आजमगढमध्ये जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
No Response to "बुखारीचे आव्हान राहुलने स्वीकारले"
Post a Comment