टार्गेट ओशो आश्रमच, पण झाला उशीर

Posted on Monday, February 15, 2010 by maaybhumi desk

पुणे

पुण्‍यातील जर्मन बेकरी स्‍फोटातील हल्‍लेखोरांसमोरील मुख्‍य टार्गेट ओशो आश्रम आणि यहुदीचे प्रार्थना स्थळ छाबड हाउसच होते. मात्र दहशतवाद्यांना नियोजित वेळी पोचणे शक्य न झाल्‍याने हा स्‍फोट जर्मन बेकरीत करण्‍यात आल्‍याचे गुप्‍तचर विभागाच्‍या सुत्रांनी दिली आहे.


click hereगुप्‍तचर विभागाच्‍या सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार दहशतवाद्यांनी सायंकाळी सात वाजेच्‍या सुमारास हल्‍ल्‍याची वेळ निश्चित केली होती. या वेळी ओशो आश्रम आणि छाबड हाऊमध्‍ये सामुहिक प्रार्थना होत असल्‍याने तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.

हल्‍ल्‍याच्‍या उद्देशाने दहशतवादी सुरूवातीला ओशो आश्रमात आले. आश्रमात रोज अंगणात प्रार्थना होत असते. मात्र शनिवारी ती वेळेपूर्वीच एका ओट्यावर झाली. त्यामुळे दहशतवादी पोचू शकले नाहीत.


त्‍यानंतर हल्‍लेखोर छाबड हाऊसमध्‍ये गेले मात्र तिथेही वेळेपूर्वीच प्रार्थना सुरू झाल्‍याने त्यांना आत जाता आले
नाही. पुण्‍यात दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या शक्यतेच्‍या पार्श्‍वभूमीवर या दोन्‍ही ठिकाणी प्रार्थनेच्‍या वेळी मोठ्या संख्‍येने पोलीस तैनात असतात. त्यामुळे दहशतवाद्यांनी तेथून परतणेच श्रेयस्‍कर समजले.

दोन्‍ही ठिकाणी अपयशी ठरल्‍यानंतर दहशतवाद्यांनी जर्मन बेकरीकडे आपला मोर्चा वळवून तिथे स्‍फोट घडवून
आणला.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "टार्गेट ओशो आश्रमच, पण झाला उशीर"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner