तालिबान विरोधात निर्णायक लढ्यास सुरूवात

Posted on Monday, February 15, 2010 by maaybhumi desk

काबुल

तालिबान्‍यांचा मुख्य गढ समजल्‍या जात असलेल्‍या दक्षिण हेलमंद प्रांतात नाटो आणि अफगाणी सैन्‍याने
दहशतवाद्यांविरोधात सुरू केलेल्‍या संयुक्त कारवाईमुळे दोन्‍ही बाजूने जोरदार धुमश्‍चक्री सुरू असून अफगाणिस्तानचे राष्ट्राध्‍यक्ष हामिद करझई यांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्‍याचे आवाहन केले आहे.


दक्षिण हेलमंद प्रांतातील माजरा भागात सुमारे सात हजार अमेरिकन मरीन आणि अफगानी सैनिकांनी कारवाई सुरू केली आहे. तर मध्य हेलमंद प्रांताच्‍या नाद अली जिल्‍ह्यात ब्रिटिश सैनिकांसह हजारो सैनिक कारवाईत गुंतले आहेत.

करझई यांनी दहशतवाद्यांना आवाहन केले आहे, की राष्ट्रहितासाठी तालिबानींनी हिंसाचाराचा मार्ग सोडून सामान्‍य अफगा‍णी नागरिकांप्रमाणे जीवन जगावे.

नाटो सैन्‍याकडून ही लढाई 'आर या पार'ची समजली जात असून एक तर दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्‍यासाठी भाग पाडणे किंवा त्यांना पूर्णतः संपविण्‍यासाठी ही कारवाई केली जात आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "तालिबान विरोधात निर्णायक लढ्यास सुरूवात"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner