ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ओळख लपवण्याचे आदेश!

Posted on Wednesday, February 03, 2010 by maaybhumi desk

सिडनी
शिवसेनेने महाराष्ट्रात ऑस्ट्रेलिया विरोधात कोणताही सामना होऊ न देण्याची धमकी दिली आहे. या धमकीमुळे आता कांगारू खेळाडूंना आपली ओळख लपवत भारतात फिरावे लागणार आहे. आयपीएलच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या एजंसीने हा निर्णय घेतला आहे.


ऑस्ट्रेलियात भारतीयांवरील हल्ले वाढत आहेत. या प्रकरणी ऑस्ट्रेलियाशी भारतीय संघाने क्रिकेट सामना खेळू नये असे सेनेने बजावले आहे. यानंतर आयपीएल सामन्या विषयी प्रश्नचिह्न निर्माण झाले होते.
केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी या प्रकरणी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. आयपीएल सुरक्षा एजंसीचे अध्यक्ष बॉब निकोलस यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना हा सल्ला दिला असून, हॉटेल बाहेर जाताना आपली ओळख त्यांनी लपवावी असे बॉब यांचे म्हणणे आहे.

शिवसेनेपासून खेळाडूंचे रक्षण करण्यासाठी खास योजना आखण्यात आली असून, खेळाडूंनी सुरक्षा रक्षकांच्या आदेशांचे पालन करावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ओळख लपवण्याचे आदेश!"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner