मुंबईत पुन्हा 'खान'वरून 'खणाखणी'
Posted on Wednesday, February 03, 2010 by maaybhumi desk
मुंबई
शाहरूख खानने शिवसेना प्रमुखांची माफी मागणार नाही, अशी उर्मटपणाचे वक्तव्य न्यूयॉर्कमध्ये करण्यापूर्वी हे विसरू नये की मन्नत मुंबईत आहे पाकिस्तानात नाही. त्याने हिंमत असेल तर हेच वाक्य पुन्हा मुंबईत बोलून दाखवावे, अशी तंबी खा.संजय राऊत यांनी दिली आहे.दरम्यान, शाहरूखच्या चित्रपटांना कुठल्याही परिस्थितीत मुंबईत प्रदर्शित होऊ देणार नाही, असा गर्भित इशारा सेनेने पुन्हा दिल्याने मुंबईतील चित्रपटगृह चालकांनी 'माय नेम इज खान'चे पोस्टर्स थिएटरवरून उतरवले आहेत. यामुळे मुंबईत चित्रपट प्रदर्शनाचे मार्ग बंद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "मुंबईत पुन्हा 'खान'वरून 'खणाखणी'"
Post a Comment