तेलंगाणा संदर्भात श्रीकृष्‍ण समितीची स्‍थापना

Posted on Wednesday, February 03, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली
स्‍वतंत्र तेलंगाणा राज्याच्‍या निर्मिती संदर्भात केंद्र सरकारने माजी न्‍यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण यांच्‍या अध्‍यक्षतेखाली एका समितीचे गठन केले असून या समितीत पाच सदस्‍यांचा समावेश आहे. या समितीची घोषणा गृह मंत्रालयाने केली आहे.


ही विशेष समिती वेगळे राज्य निर्मितीच्‍या विविध मुद्यांवर आणि सर्व पक्षांशी चर्चा करून एका निश्चित वेळेत आपला अहवाल सादर करणार आहे.

या समितीत अध्यक्ष बी.एन. श्रीकृष्ण यांच्‍यासह कुलगुरू डॉ.रणवीर सिंह, प्रा.अबू सालेह, डॉ.रवींद्र कौर आणि माजी गृह सचिव विनोद दुग्गल यांचा समावेश असणार आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "तेलंगाणा संदर्भात श्रीकृष्‍ण समितीची स्‍थापना"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner