महाराष्ट्रावर बरसली 'ममता'
Posted on Wednesday, February 24, 2010 by maaybhumi desk
रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी आज रेल्वेचा अर्थसंकल्प जाहीर केला. स्थानिक भाषांना यापुढील काळात प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, महाराष्ट्राच्या वाट्याला यंदा त्यांनी बरेच काही दिले आहे. ममतांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या घोषणेतील काही ठळक मुद्दे.
- मुंबईमध्ये उपनगरांसाठी 101 नवीन लोकल देण्यात येणार
- स्थानिक भाषांमध्ये परीक्षा घेण्यात येणार असल्याने मराठी तरुणांना आता रेल्वे भरती परीक्षांमध्ये प्राधान्य मिळणार आहे. मनसेने यासाठी मागणी काही दिवसांमध्ये बराच राडा केला आहे.
- नाशिकमध्ये रेल्वे बॉटलिंगचा खास प्रकल्प सुरू करण्याची घोषणा ममतांनी केली आहे.
- मुंबईमध्ये क्रीडा अकादमी स्थापन करण्याची घोषणा.
- अमळनेर तसेच जालना-खामगाव रेल्वेने जोडणार
- ज्येष्ठ नागरिकांसाठी खास ट्रॉलीची सोय.
- वेस्टर्न कॅरिडोअरचा निर्णय महाराष्ट्र सरकारवर.
- मा जी सैनिकांना आरपीएफमध्ये स्थान देणार.
- महिला कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी पाळणाघर.
- रेल्वे स्थानकांना महापुरुषांचे नाव देणार
- गुवाहाटी-मुंबईदरम्यान कर्मभूमि एक्सप्रेस.
- नाशिक- हैदराबाद स्पेशल ट्रेन.
- इंदूर-मुंबई दरम्यान दुरंतो, मुंबई- हावडा सुरु होणार.
- दरभंगा-मुंबई रेल्वे.
- कोल्हापूर- सोलापूर एक्सप्रेस.
- सुल्तानपूर-मुंबई
- बेंगलूरु-नांदेड एक्सप्रेस.
- हरिद्वार-मुंबई एक्सप्रेस.
- नाशिक-हैदराबाद नवीन गाडी धावणार.
- हावडा-शिर्डी नवीन गाडी.
- 54 नवीन गाड्यांमध्ये मुंबई, पुणे, नाशिकला प्राधान्य.
- पुणे-दोंड नवीन गाडी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "महाराष्ट्रावर बरसली 'ममता'"
Post a Comment