विश्वविक्रमवीर सचिनचे वन डेत द्विशतक
ग्वाल्हेर
ग्वाल्हेरमध्ये खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 201 धावांची विश्वविक्रमी फलंदाजी केली असून या दमदार खेळीच्या बळावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रीकेसमोर 402 धावांचे अवघड आव्हान ठेवले आहे. सचिन तेंडुलकरने 147 चेंडूत 201 धावा केल्या.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार महेन्द्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वेन पार्नेलकडून वीरेन्द्र सहेवाग बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या दिनेश कार्तिक सोबत सचिनने दमदार फलंदाजी करताना आपल्या कारकीर्दीतील 46 वे शतक केले. तर दिनेशनेही 79 धावा केल्या. कार्तिक बाद झाल्यानंतर आलेल्या पठाणनेही सचिनला चांगली साथ दिली. हुक करण्याच्या नादात तो 36 धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या धोनीने कर्णधाराला साजेशी खेळी करीत 35 चेंडूत 68 धावा केल्या. भारतीय संघाने दक्षिण आफ्रीकेसमोर 402 धावांचे आव्हान ठेवले आहे.
No Response to "विश्वविक्रमवीर सचिनचे वन डेत द्विशतक"
Post a Comment