ममता एक्सप्रेसचे 'माईल स्टोन'
नवी दिल्ली
रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी आज लोकसभेत सादर केलेल्या 2010-11 च्या रेल्वे अर्थ संकल्पातील काही प्रमुख मुद्दे:
1. प्रवास भाड्यात कुठलीही वाढ नाही.
2. 54 नवीन गाड्या सुरू करणार.
3. 28 नवीन एक्सप्रेस ट्रेन.
4. 21 गाड्यांचा रूट वाढला.
5. 12 गाड्यांच्या फे-या वाढल्या.
6. 16 मार्गांवर 'भारत तीर्थयात्रा' एक्सप्रेस.
7. लांब पल्ल्याच्या सहा दुरांतो गाड्या.
8. कमी अंतराच्या चार 'दूरांतो' गाड्या.
9. महिला विशेष गाड्यांचे नाव बदलून 'मातृभूमी विशेष' करणार.
10.'कर्मभूमी' नावाने तीन अनारक्षित गाड्या.
11. रवींद्रनाथ टागोर यांच्या 150 व्या जन्मदिनानिमित्त देशभरात 'संस्कृती एक्सप्रेस' चालविली जाणार आहे. ही गाडी बांग्लादेशातही नेण्याचा प्रस्ताव आहे.
12. उपचारासाठी जाणा-या कॅन्सर रुग्णांसाठी 3-एसी आणि स्लीपर क्लासमध्ये मोफत प्रवास.
13. ई-टिकटवरील सेवा शुल्कात कपात करून शयनयान श्रेणीसाठी 10 आणि एसीसाठी 20 रुपये केला.
14. महागाई कमी करण्यासाठी सहकार्य करण्यासाठी घरगुती वापराचे खाद्यान्न आणि रॉकेल वाहतुकीत 100 रुपये
प्रती बोगी कपात.
15. पत्रकारांच्या पती व पत्नीसाठी प्रवास भाड्यात 50 टक्क्यांची सवलत तर त्या पत्रकारांच्या 18 वर्षांपेक्षा लहान मुलांनाही सवलत मिळणार आहे.
16. प्रादेशिक चित्रपट उद्योगातील तंत्रज्ञांना चित्रपट निर्मितीसंबंधी कामासाठी प्रवास करताना सर्व गाड्यांमध्ये द्वितीय शयनयान श्रेणीत 75 टक्के प्रवास भाड्यात सुट तर त्यावरील श्रेणीत 50 टक्क्यांची सुट.
17. राष्ट्रकूल खेळांसाठी रेल्वे महत्वाची भागीदारी. राष्ट्रकूल प्रदर्शनी ट्रेन चालविली जाणार.
18. हॉकीसाठी आणखी काही ठिकाणी एस्ट्रो टर्फ उपलब्ध करणार.
19. दिल्ली, सिकंदराबाद, चेन्नई, कोलकाता और मुंबईत पाच क्रिडा अकादमी स्थापनेचा प्रस्ताव.
20. लांबी पल्ल्याच्या 20 ट्रेन्समध्ये अटोमॅटिक अग्नी व धूर सूचक यंत्रणा बसविणार.
21. देशभरातील सर्व लेव्हल क्रॉसिंगवर पाच वर्षांत गार्ड बसविणार.
22. महिला वाहिनी नावाने महिलांना रेल्वे सुरक्षा दलात सहभागी करून 12 कंपनी बनविणार.
23. 94 स्टेशन्सना आदर्श स्टेशन बनविणार.
24. दहा प्रमुख स्टेशन्सना आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेशन बनविणार.
25. 93 अतिरिक्त बहुउद्देशीय परिसरांची निर्मिती.
No Response to "ममता एक्सप्रेसचे 'माईल स्टोन'"
Post a Comment