रेल्वे बोर्डाची परीक्षा आता मराठीतूनही
रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षा हिंदी, इंग्रजी व ऊर्दुसह सर्व स्थानिक व प्रादेशिक भाषांमध्ये घेणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. रेल्वे अर्थसंकल्पाच्या सुरूवातीलाच आपल्या भाषणात बॅनर्जी म्हणाल्या, की यापूर्वी होणारी रेल्वे भरती परीक्षा आता सर्व प्रादेशिक भाषांमध्येही घेण्यात येणार असून त्याद्वारे अधिकाधिक तरुणांना परीक्षा देता यावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
तसेच या परीक्षा देशभरात एकाच दिवशी घेण्याची महत्वाची घोषणाही त्यांनी केली.
यापूर्वी रेल्वेच्या परीक्षा केवळ हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये होत असल्याने स्थानिक उमेदवारांना परीक्षा देताना अडचणी येत होत्या. याच मुद्यावरून मनसे नेते राज ठाकरे यांनी मोठे आंदोलनही चालविले होते. आज अखेर या संदर्भातील घोषणा रेल्वे मंत्र्यांनी बजेट सादर करताना केली आहे.
No Response to "रेल्वे बोर्डाची परीक्षा आता मराठीतूनही"
Post a Comment