ममता दीदींच्या पोतडीतून काही खास
रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी आज लोकसभेत 2010-11 साठीचा रेल्वे अर्थ संकल्प जाहीर केला. यात अनेक सवलती देत त्यांनी सामान्यासाठी काम करणारे सरकार ही सरकारची छाप कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रवास भाड्यात कोणतीही वाढ न करता, त्यांनी अनेक सुविधांची व नवीन गाड्यांचीही घोषणा केली आहे. अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे असे-
दर वर्षात एक हजार किलोमीटर रेल्वे लाईनचे काम
रेल्वेसाठी व्हिजन 2020
खाजगी क्षेत्रासोबत रेल्वेची भागिदारी आवश्यक
7 महिन्यात 117 नवीन गाड्या सुरु करणार
सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना
पिण्याच्या पाण्यासाठी नाशिक, अंबालासह सहा ठिकाणी नवीन बॉटलींग प्रकल्प सुरू करणार.
प्रवाशांना चांगल्या दर्जाचे अन्न पुरवठ्यासाठी विशेष तरतुदी.
जिल्हाधिकारी कार्यालये आणि ग्रामपंचायतींमध्ये ई-रेल्वे तिकिट काऊंटर उघडणार.
पाच वर्षांत देशभर रेल्वेचे जाळे विस्तारणार.
रेल्वे सुरक्षेसाठी स्पेशल टास्क फोर्स स्थापन केली जाईल.
अपघातांची संख्या कमी करण्यासाठी विशेष उपकरणांचा वापर.
पाच वर्षांत प्रत्येक रेल्वे क्रॉसिंगवर गार्ड.
सोयी-सुविधांसाठी खाजगी क्षेत्रांचे सहकार्य घेतले जाणार.
आरपीएफमध्ये महिलांची भरती करणार.
रेल्वे पाच खेळ अकादमींची स्थापना.
खेळाडूंसाठी रेल्वेत नोकरीस विशेष आरक्षण
हावडा येथे रवींद्र म्युझियम (गीतांजली म्युझियम) बनविणार.
कर्मचा-यांसाठी 381 ठिकाणी तपासणी केंद्रे.
रेल्वे स्कूल आणि कॉलेज उघडणार.
रेल्वे कर्मचा-यांसाठी गृह योजना.
रेल्वे कर्मचा-यांच्या मुलांसाठी होस्टेल्स सुरू करणार
कॉमन वेल्थ गेम्सच्या लिंक पार्टनरची जबाबदारी.
खडगपूरमध्ये लोको पायलट ट्रेनिंग सेंटर उघडणार.
प्रवाशांच्या सोयींसाठी 1302 कोटींचा निधी
कुलींसाठी आरोग्य विमा योजना
रायबरेली येथे एका वर्षांत कोच फॅक्ट्री सुरू करणार.
आणखी काही नवीन रेल्वे कोच फॅक्ट्री उघडणार
बोलपूरमध्ये गीतांजली रेल्वे म्युझीयम
50 पाळणाघरांची घोषणा
93 बहुउद्देशीय कॉम्पलेक्स सुरु करणार
अल्पसंख्यांक व महिलांना सवलत
मुंबईजवळ व्हॅगन रिपेअरींग सेंटर सुरू करणार
मोठ्या रेल्वे स्टेशन्सवर कोल्ड स्टोरेज.
पाच नवीन व्हॅगन कारखाने सुरू करणार.
सिंगूरमध्ये जमीन मिळाल्यास रेल्वे फॅक्ट्री.
10 ठिकाणी ऑटो मोबाईल हब उभारणार.
No Response to "ममता दीदींच्या पोतडीतून काही खास"
Post a Comment