फॅक्स नंबरच्‍या बदल्‍यात माओवाद्यांचा मोबाइल नंबर

Posted on Wednesday, February 24, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली

गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी माओवाद्यांच्‍या शांतता प्रस्‍तावास अनुकुलता दर्शवून फॅक्स नंबर दिल्‍यानंतर माओवाद्यांनीही चर्चेसाठी एक पाऊल पुढे टाकत आपला मोबाइल नंबर प्रसारित करून सरकारला चर्चेसाठी आंत्रित केले आहे.


तत्‍पूर्वी माओवादी नेता कोटेश्वर राव उर्फ किशनजी यांच्‍याकडून आलेल्‍या शांतता प्रस्तावावर गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी सतर्कता दर्शवित चिदंबरम यांनी हिंसाचाराचा त्याग करून चर्चेसाठी तयार असल्‍याचे म्हटले होते. मात्र या चर्चेपूर्वी कुठलीही अट आपल्‍याला मान्‍य नसल्‍याचे गृहमंत्र्यांनी स्‍पष्‍ट करून गृहमंत्रालयाचा 011-23093155 हा फॅक्स क्रमांक माओवाद्यांना दिला होता. माओवाद्यांचे काही म्हणणे असल्‍यास त्‍यांनी या क्रमांकावर ते पाठवावे असे सांगून ते मिळाल्‍यानंतर आपण पंतप्रधानांशी चर्चा करू असे गृहमंत्रालयाने जाहीर केले होते.

त्‍यांच्‍या या वक्तव्‍यानंतर किशनजी यांच्‍या प्रवक्‍त्‍याने मंगळवारी आपल्‍या नेत्याच्‍या माध्‍यमातून एक मोबाइल नंबर प्रसारित केला आहे. तसेच फॅक्स पाठवून या क्रमांकावर 25 फेब्रुवारी रोजी फोन करण्‍यास सांगितले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "फॅक्स नंबरच्‍या बदल्‍यात माओवाद्यांचा मोबाइल नंबर"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner