आमीर व शाहरूख पुणे स्फोटाचे प्रमुख सुत्रधार!
Posted on Sunday, February 21, 2010 by maaybhumi desk
नवी दिल्ली
पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटाचा सुत्रधार इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक कमांडर आमीर रझा खान हा असण्याचा संशय तपास यंत्रणांना असून त्याला यासाठी शाहरूख नामक तरुणाने मदत केल्याची माहिती समोर आली आहे. रझा खानने हा कट तयार केला व लश्कर-ए-तोयबाचा कमांडर प्रमुख अबू अल कामा याच्यासोबत हा बॉम्बस्फोट घडवून आणला, अशी माहितीही समोर आली आहे.
इकबाल भटकळ व रियाझ भटकळ या त्यांच्या दोन हस्तकांनी प्रत्यक्षात हा स्फोट घडवून आणला असून, उडुपी येथील शाहरुख नामक दहशतवाद्याने त्यांना या कामी मोठी मदत केली, असल्याची माहितीही दिल्ली पोलिसांनी काल, शुक्रवारी ताब्यात घेतलेल्या अनिता दास नामक संशयित महिलेने दिली असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "आमीर व शाहरूख पुणे स्फोटाचे प्रमुख सुत्रधार!"
Post a Comment