लोकबिरादरी प्रकल्‍पात श्रमसंस्‍कार शिबिर

Posted on Sunday, February 21, 2010 by maaybhumi desk

हेमलकसा, ता.भामरागड

कुष्‍ठरोग्यांची सेवा करण्‍याची परंपरा जोपासणा-या बाबा आमटे यांच्‍या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवत गडचिरोली जिल्‍ह्यातील हेमलकसा येथे माडीया गोंड या आदीम जमातीच्‍या सर्वांगिण विकासासाठी कार्य करीत असलेल्‍या लोक बिरादरी प्रकल्‍पातर्फे दि.15 ते 22 मे दरम्‍यान श्रमसंस्‍कार छावणी शिबिराचे आयोजन करण्‍यात आले असून या शिबिरात सहभागाचे आवाहन करण्‍यात आले आहे.


बाबा आमटे यांच्‍या प्रेरणेतून स्‍थापन झालेल्‍या महारोगी सेवा समितीतर्फे गेल्‍या  42 वर्षांपासून हे शिबिर सोमनाथ प्रकल्‍प येथे भरविले जात असते. यंदा प्रथमच ते बाबांचे पुत्र डॉ.प्रकाश व स्‍नुषा डॉ.मंदाकिनी आमटे या मॅगसेसे पुरस्‍कार विजेत्‍या दाम्‍पत्या मार्फत चालविल्‍या जात असलेल्‍या लोक बिरादरी प्रकल्‍पात आयोजित करण्‍यात आले आहे.

दि.15 ते 22 मे दरम्‍यान होणा-या या शिबिरात दरवर्षी देशभरातील तरुण-तरुणी सहभागी होऊन निसर्गाच्‍या सानिध्‍यात श्रमदान करत असतात. तसेच ज्‍वलंत सामाजिक प्रश्‍नांवरील विचारांची देवाण-घेवाण करीत असतात.
आमटे दाम्पत्याने उभारलेले काम जवळून पाहण्‍याची ही संधी असून शिबिरात सहभागी होण्‍यासाठी अनिकेत प्रकाश आमटे, लोकबिरादरी प्रकल्‍प, हेमलकसा, ता.भामरागड, जि.गडचिरोली (महाराष्‍ट्र) येथे किंवा 9423646185, 9403300503 अथवा Hemalkasacamp@gmail.com येथे संपर्क करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे. 

हे देखिल वाचाः 

हेमलकसाच्‍या अरण्‍यातील मंदाकिनी

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "लोकबिरादरी प्रकल्‍पात श्रमसंस्‍कार शिबिर"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner