'मातोश्री'च्या संरक्षणाला शिवसैनिक सरसावले
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारचे संरक्षण परत पाठवले आहे. यानंतर आता शिवसैनिकांनीच आपल्या गडाचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला असून, आळीपाळीने शिवसैनिक मातोश्रीवर पहारा देणार आहेत.
कॉग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्या दौऱ्यात सेनेने त्यांना काळे झेंडे दाखवल्याने कॉग्रेसने नाराजी व्यक्त करत सेनेच्या नाड्या आवळण्याचे आदेश मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिले आहेत. यानंतर त्यांनी सेनेच्या आमदारांचे संरक्षण काढून घेतले आहे.
शिवसैनिकांनी कायदा व सुव्यवस्था हातात घेणे न थांबवल्यास सरकार उद्धव यांचीही सुरक्षा काढून घेईल अशी धमकी त्यांनी दिली होती. त्यांच्या धमकीनंतर उद्धव यांनी स्वतः:हून आपले संरक्षण सरकारला परत केले आहे.
उद्धव आणि बाळासाहेब यांच्या संरक्षणासाठी आता शिवसैनिकांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी अनेक शिवसैनिकांनी आठ-आठ तास मातोश्रीवर येण्याची तयारी दर्शवली आहे.
No Response to "'मातोश्री'च्या संरक्षणाला शिवसैनिक सरसावले"
Post a Comment