रामदेव बाबांचे आता 'निवडणुकासन'

Posted on Wednesday, February 10, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली

योग गुरू बाबा रामदेव यांनी आता राजकारणाच्या आखाड्यातही प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, 2014 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ते उमेदवार म्हणून उतरणार आहेत. ओरिसात त्यांनी याची घोषणाही केली आहे.
चांगला राजकारणी बनण्यासाठी फारसे काही लागत नाही. देश-विदेशातील अनेक जण आपल्याला मानतात. देशातील विविध राज्यांतील मुख्यमंत्री आपल्याला मान देतात. आपण त्यांच्यापैकीच एक असून, आपणही निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यासाठी एखाद्या राजकारण्याप्रमाणे आपणही वोट बँक जमवण्यास सुरुवात केल्याचेही त्यांनी कौतुकाने स्पष्ट केले आहे. आपण निवडून आल्यावर देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक तरी योग गुरू असेल याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "रामदेव बाबांचे आता 'निवडणुकासन'"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner