सुरक्षेसाठी कॅबिनेटची महत्‍वाची बैठक सुरू

Posted on Saturday, February 13, 2010 by maaybhumi desk

मुंबई

पुण्‍यातील कोरेगाव भागात झालेल्‍या बॉम्बस्‍फोटाच्‍या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाची तातडीने बैठक बोलावण्‍यात आली असून सुरक्षेच्‍या प्रश्‍नासंदर्भात आढावा घेतला जात आहे. या स्‍फोटामध्‍ये लष्‍कर ए तोयबाचा हात असल्‍याचा संशय वर्तविला जात आहे.

गृहमंत्रालयाने स्‍फोटाची घटना हा दहशतवादी हल्‍ला असल्‍याचे जाहीर केले असून त्यात आतापर्यंत 10 जण ठार झाल्‍याचे आणि 40 जण जखमी झाल्‍याचे अधिकृत रित्या जाहीर केले आहे. घटना स्‍थळी मुंबई आणि पुण्‍यातील एटीएसची पथक दाखल झाले असून राष्‍ट्रीय तपास यंत्रणेचे पथकही घटनेची माहिती घेण्‍यासाठी आणि तपासासाठी रवाना झाले आहे.

राज्‍याचे गृहमंत्री आर.आर.पाटील हे तातडीने पुण्‍याकडे रवाना झाले असून पुण्‍याचे पालकमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील हे देखिल या ठिकाणी रवाना झाले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "सुरक्षेसाठी कॅबिनेटची महत्‍वाची बैठक सुरू"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner