टेक्सास शहरात विमानाची इमारतीला धडक
Posted on Thursday, February 18, 2010 by maaybhumi desk
अमेरिकेतील टेक्सास शहरातील एका सात मजली इमारतीस छोटे विमान धडकले असून या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला आहे किंवा नाही याबाबत अद्याप कुठलीही माहिती देण्यात आली नसली तरीही विमानाच्या चालकाने ते चोरून आणल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले आहे.
येथील ऑस्टीन बिल्डींग या सात मजली इमारतीस एका खाजगी कंपनीचे चार सीटर विमान धडकले असून या अपघातानंतर या संपूर्ण इमारतीला आग लागली आहे. विमानात दोन प्रवासी होते. अपघातातील मृतांची संख्या अद्याप समजू शकलेली नाही. या इमारतीच्या शेजारीच एफबीआयचे कार्यालय आहे.
अपघातानंतर लगेचच वायुसेनेचे दोन फायटर एफ 16 विमान आकाशात झेपावले असून इमारत रिकामी करण्यात आली आहे. पायलटने हे विमान चोरून आणले होते. ते उड्डाणानंतर लगेचच ऑस्टीन इमारतीला धडकडे आहे. पोलिसांनी तो दहशतवादी हल्ला वाटत नसल्याचे म्हटले असून विमान निश्चित उंचीपेक्षा खाली असल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी म्हटले आहे. जोसेफ एंन्ड्र्यु नावाच्या या पायलटने विमान चोरून नेण्यापूर्वी एका घरात आग लावल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
या ठिकाणी बचावकार्य वेगाने सुरू असून संपूर्ण परीसर सील करण्यात आला आहे. या संदर्भात अद्याप विस्तृत माहिती कळू शकलेली नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "टेक्सास शहरात विमानाची इमारतीला धडक"
Post a Comment