भारताशी चर्चेत काश्मीर मुद्दाहीः पाक
इस्लामाबाद
आगामी 25 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत होणार असलेल्या परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चेदरम्यान पाकिस्तान कुठलाही मुद्दा उपस्थित करण्यास स्वतंत्र असून त्यात काश्मीर प्रश्न, नद्यांच्या पाण्याचे वाटप आणि बलुचिस्तानात भारताचा कथित हस्तक्षेप हे देखिल मुद्दे असू शकतात असे सुतोवाच पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल बासित यांनी दिले आहे.
बासित म्हणाले, की भारताने चर्चा करण्यासाठी सुरूवातीपासून कुठलीही अट ठेवलेली नाही. त्यामुळे पाकिस्तान कुठल्याही मुद्यावर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र आहे. त्यात काश्मीर प्रश्न, नद्यांच्या पाणी वाटपावर निर्माण झालेले वाद आणि बलूचिस्तान व अफगाणिस्तानात भारताचा कथित हस्तक्षेप या मुद्यांचाही समावेश आहे. काश्मीर मुद्दा आतापर्यंत सुटू न शकण्याचे कारण भारताचे दुर्लक्ष असल्याचा आरोप बासित यांनी केला आहे.
No Response to "भारताशी चर्चेत काश्मीर मुद्दाहीः पाक"
Post a Comment