श्रीकृष्ण समितीच्या विरोधात तेलंगाणा बंद
Posted on Saturday, February 13, 2010 by maaybhumi desk
हैदराबाद
वेगळ्या तेलंगाणा राज्याच्या निर्मितीसाठी स्थापित करण्यात आलेल्या श्रीकृष्ण समितीच्या कार्यक्षेत्राच्या घोषणेविरोधात आज तेलंगाणा बंदचे आवाहन करण्यात आले असून या बंद नंतर तेलंगाणा आंदोलन पुन्हा सुरू होण्याचीशक्यता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या संयुक्त कृती समितीने हैदराबादसह नऊ जिल्ह्यांमध्ये बंदचे आवाहन केलेअसून त्यास संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
दरम्यान, बंदच्या आवाहनानंतर आंध्र प्रदेश राज्य रस्ता परिवहन निगमनेही तेलंगाणा भागात बस सेवा स्थगितकेल्या आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर या भागातील बंदोबस्त वाढविण्यात आला असून ठिकठिकाणी पोलीस आणिनीमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "श्रीकृष्ण समितीच्या विरोधात तेलंगाणा बंद"
Post a Comment