नक्षलवादीही देशाचे नागरिकः सर्वोच्च न्यायालय
Posted on Wednesday, February 17, 2010 by maaybhumi desk
नवी दिल्ली
देशभरात सुरू असलेला नक्षलवादी हिंसाचार ही चिंतेची बाब असून ते थांबले पाहिजे. मात्र नक्षलवाद्यांचे आंदोलन हे देशा विरोधात युद्ध ठरू शकत नाही कारण नक्षलवादीही देशाचे नागरिक आहेत, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.नक्षलवाद्यांनी केलेल्या हिंसाचाराच्या घटनांचे माध्यमातून येणारे वृत्तांकन ब-याचदा चुकीचे असते नक्षलवादामुळे आतापर्यंत सुमारे दोन लाख नागरिकांचे पलायन झाले आहे. या लोकांचा उदरनिर्वाह कसा चालला आहे. कुणीही याबाबत विचार करायला तयार नाही. सरकार कायदा व्यवस्था मजबूत करण्याकडे लक्ष देत आहे. मात्र नक्षलवादी भागातील मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.
छत्तीसगढमधील सहा प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांच्या साक्षी नोंदवून घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना आपल्या गावात परत जाण्याची मुभा दिली आहे. दंतेवाडा येथील घटनेसंदर्भात सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे मत व्यक्त केले आहे. यात छत्तीसगढ पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी निरपराध आदीवासींवर अन्याय केल्याचा आरोप आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "नक्षलवादीही देशाचे नागरिकः सर्वोच्च न्यायालय"
Post a Comment