शिवसेनेसोबत युती कायमः भाजपा

Posted on Wednesday, February 17, 2010 by maaybhumi desk

इंदूर
महाराष्ट्रात शिवसेने सोबत भाजपचे काही बाबतीत मतभेद असले तरीही त्‍याचा कुठलाही परिणाम युतीवर होणार नसून दोन्‍ही पक्षांची युती कायम राहील, असे भाजपने आज स्‍पष्‍ट केले.

भाजपच्‍या राष्ट्रीय कार्यकारिणीच्‍या बैठकीत पक्ष प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी याबाबत पत्रकारांना सांगितले, की भारत भूमी सर्व भारतीयांची आहे अशी भाजपची भूमिका आहे. अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही ही भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना याबाबत त्‍यांची वेगळी भूमिका मांडत असली तरीही त्याचा युतीवर कुठलाही परिणाम होणार नाही.

रालोआकडे आघाडीचे सरकार चालवण्‍याचा मोठा अनुभव आहे. 26 पक्षांसोबत आम्ही सरकार यशस्‍वी रित्या चालवून दाखवले आहे. या सर्व पक्षांशी आमचे तत्वतः अनेक मुद्यांवर मतभेद आहेत. मात्र सरकारवर त्‍याचा कुठलाही परिणाम झाला नाही. शिवसेनेसोबत आमचा 25 वर्षांचा घरोबा आहे आणि तो कायम राहील, असेही त्यांनी स्‍पष्‍ट केले.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "शिवसेनेसोबत युती कायमः भाजपा"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner