पुणे स्फोटाची जबाबदारी 'अल अलामी'ने स्वीकारली
Posted on Wednesday, February 17, 2010 by maaybhumi desk
लाहोर
पाकिस्तानातील अल अलामी या अज्ञात दहशतवादी संघटनेने पुणे स्फोटाची जबाबदारी स्वीकारली असून ही संघटनालश्कर-ए-तैयबाशी संबंधित असल्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी वर्तविली आहे. या हल्ल्यात 9 जण जागीच तरदोघे उपचारा दरम्यान ठार झाले आहेत.या दहशतवादी संघटनेचा कथित प्रवक्ता असलेल्या अबु जिंदाल याने इस्लामाबादमध्ये असलेल्या एका भारतीयपत्रकाराला फोन करून पुणे स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. भारत-पाक दरम्यान होत असलेली चर्चा बंदपाडणे आणि भारताची अमेरिकेसोबत वाढत चाललेली जवळीकता या निषेधार्थ आपण स्फोट घडवल्याचे संघटनेच्याप्रवक्त्याने संबंधित पत्रकाराला सांगितले आहे.
संघटनेने स्पष्ट केले आहे, की जो कुणी अमेरिकेशी जवळीक करेल आम्ही त्या देशा विरोधात युध्द करू मग तो भारत असो किंवा पाक.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "पुणे स्फोटाची जबाबदारी 'अल अलामी'ने स्वीकारली"
Post a Comment