सीबीआय चौकशीसाठी परवानगीची गरज नाही
Posted on Wednesday, February 17, 2010 by maaybhumi desk
नवी दिल्ली
एखाद्या घटनेच्या सीबीआय चौकशी करण्याची गरज भासल्यास ती करण्याचा अधिकार राज्य सरकार व्यतिरिक्तसर्वोच्च व उच्च न्यायालयालाही असल्याचा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र अशा सूचनादेताना त्या अधिकाराचा कधीतरी आणि योग्य कारण असल्याशिवाय वापर करू नये अशा सुचनाही न्यायालयानेदिल्या आहेत.न्यायालयाने स्पष्ट केले, की सर्वोच्च व उच्च न्यायालय नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे संरक्षक म्हणून कामकरीत असतात. त्यामुळे एखाद्या घटनेच्या सीबीआय चौकशीच्या सूचना देण्याचा हक्क दोन्ही न्यायालयांना आहे.त्यासाठी राज्याकडून परवानगी घेण्याची गरज नाही.
2001 मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाने तृणमूल कॉंग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या हत्येच्या सीबीआय चौकशीचेआदेश दिले होते. त्या विरोधात प.बंगाल राज्य सरकारतर्फे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरसुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय दिला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "सीबीआय चौकशीसाठी परवानगीची गरज नाही"
Post a Comment