अलकायदाची विदेशी खेळाडूंना धमकी

Posted on Tuesday, February 16, 2010 by maaybhumi desk

इस्‍लामाबाद

भारतात एका पाठोपाठ होत असलेल्‍या हल्‍ल्‍यांमुळे दहशतवाद्यांचे मनोधैर्य वाढत चालले असून आता अल-कायदाचा दहशतवादी इलीयास काश्मीरी याने विदेशी खेळाडूंनी भारतात होत असलेल्‍या हॉकी वर्ल्ड कपमध्‍ये न येण्‍याची धमकी दिली आहे.


इलियास काश्मीरीने एका ई-मेलच्‍या माध्‍यमातून धमकी दिली आहे, की जे खेळाडू भारतात जातील त्यांनी त्‍याचे परिणाम भोगण्‍यास तयार रहावे. टॉप गुरिल्ला कमांडर इलियास काश्मीरी अलकायदाच्‍या ‘313 ब्रिगेड’चा प्रमुख  आहे. इलियास काश्मीरी पाकिस्तानच्‍या फाटा भागात वास्‍तव्‍यास आहे.

इलियासने पाठवलेल्‍या ई-मेलमध्‍ये स्‍पष्‍ट शब्‍दात लिहीले आहे, की आंतरराष्‍ट्रीय समुदायाने आपले खेळाडू हॉकी वर्ल्ड कप, आयपीएल आणि कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतात पाठवू नये तसेच कुणीही परदेशी नागरिकाने भारतात जाऊ नये अन्‍यथा परिणामांचा सामना करण्‍यास तयार रहावे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "अलकायदाची विदेशी खेळाडूंना धमकी"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner