ज्युनियर बच्चनकडून शाहरूखचे समर्थन
मुंबई
पाकिस्तानी खेळाडूंविषयी सहानुभूती दाखविल्याने शिवसेनेच्या टीकेचे लक्ष्य ठरलेल्या शाहरूख खानचे समर्थन करण्यासाठी आता अमिताभपुत्र अभिषेक बच्चन धावून आला आहे.
शिवसेनेने शाहरूखचा माय नेम इज खान हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित होऊ देणार नाही अशी धमकी दिली आहे. यासंदर्भात बच्चन कुटुंबातील कुणी पहिल्यांदाच आपले मौन सोडले आहे.
अभिषेकने ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर यासंदर्भात मत व्यक्त केले आहे. त्यात तो म्हणतो, की गेल्या काही दिवसांत जे काही होते आहे ते दुर्देवी व निराशाजनक आहे. क्रीडा, कला व संस्कृती यांना राजकारणापासून दूर ठेवायला हवे. मी व माझे कुटुंब अशा परिस्थितीतून गेलो आहोत. मी सर्व नागरिकांना शांतता व सौहार्द राखण्याची विनंती करतो.'
ट्विटरवर यासंदर्भात प्रीती झिंटा, रितेश देशमुख, अनुपम खेर, गुल पनाग, रणवीर शौरी या सेलिब्रेटिजनी आपली मते व्यक्त केली आहेत
No Response to "ज्युनियर बच्चनकडून शाहरूखचे समर्थन"
Post a Comment