शाहरुख खानचा आता मनसेला 'चिमटा'
नवी दिल्ली
आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंची पाठराखण केल्यानंतर आता शाहरुख खानने मराठीच्या मुद्द्याला हात घालत मनसेला चिमटा घेण्याचा प्रयत्न केला आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने मुंबई ही सर्व भारतीयांची असून, केवळ मराठी माणसांचा यावर अधिकार असल्याचे सांगणे चुकीचे असल्याचे त्याने म्हटले आहे.
कोणत्याही राज्याच्या अस्मितेपूर्वी देशाची अस्मिता महत्त्वाची असून, मुंबईवर सर्व भारतीयांचा अधिकार असल्याचे त्याने म्हटले आहे. मुंबईतच आपण लहानाचे मोठे झालो, आगामी काळात आपले भविष्यही मुंबईच असून, आपण मुंबई विरोधी नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
आपण भाषिक शिक्षणाबाबतीत मागे असून, यामुळेच आपल्याला दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांकडून ऑफर येत नसल्याचे सांगतानाच आपल्या मुलांचा जन्म मुंबईत झाल्याने त्यांना मात्र चांगली मराठी जमत असल्याचे त्याने म्हटले आहे.
मुंबई राहण्यासाठी मराठी आवश्यकच आहे, यावर आपला मुळीच विश्वास नसून आपणही इतरांप्रमाणे शंभर टक्के मुंबईकर असल्याचे त्याने म्हटले आहे.
No Response to "शाहरुख खानचा आता मनसेला 'चिमटा'"
Post a Comment