'फिर मिले सूर' मध्ये आता सचिनचाही समावेश

Posted on Monday, February 08, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली
'मिले सूर मेरा तुम्हारा' या गाण्याची 'फिर मिले सूर मेरा तुम्हारा' या गाण्याची नवी आवृत्ती नव्या रूपात प्रजासत्ताक दिनी सादर करण्यात आली. पण जुन्या सुरांच्या तुलनेत हे 'नवे सूर' काही जुळलेच नाही. त्यातच या आवृत्तीत प्रातिनिधीक रूपात का होईना सचिन तेंडुलकरसह एकही क्रिकेटपटू नसल्याने लोकांनी नाराजीही व्यक्त केली. पण आता ही चुक दुरूस्त करण्यात येणार असून त्यात सचिनचा समावेश करण्यात येणार आहे.

कैलाश सुरेंद्रनाथ यांच्या कल्पनेतून 'फिर मिले सूर मेरा तुम्हारा' नव्या रूपात साकारण्यात आले. पण तब्बल वीस वर्षे मैदान गाजविणार्‍या सचिन तेंडुलकरचा समावेश त्यात नसल्याबद्दल क्रिकेट शौकिनांनी आश्चर्य व्यक्त केले. जुन्या आवृत्तीत कपिल देव, सुनील गावसकरसह क्रिकेटपटूंचा समावेश होता. नव्या आवृत्तीत मात्र भारतातील सर्वांत लोकप्रिय खेळ असलेल्या क्रिकेटलाच वाळीत टाकण्यात आले होते. यासंदर्भात स्पष्टीकरण करताना कैलाश सुरेंद्रनाथ म्हणाले, की आम्ही या गाण्याच्या नव्या आवृत्तीत सचिनसह इतर क्रिकेटपटूंना घेण्याचे ठरवले होते. पण त्यावेळी सर्व खेळाडू त्यांचे नियोजित सामने खेळण्यात व्यस्त होते. त्यातून वेळ काढणे त्यांच्यासाठी शक्य नव्हते.

आम्हालाही हे गाणे प्रजासत्ताकदिनीच प्रकाशित करायचे होते.'

आता सुरेंद्रनाथ ही चुक दुरूस्त करणार असून सचिन तेंडुलकरचा तुकडा शूट करून तो गाण्यात जोडला जाणार आहे. १९८० च्या दशकात मिले सूर मेरा तुम्हारा हे गाणे तयार करण्यात आले. त्यात विविध गायक व विविध प्रांतातील प्रख्यात व्यक्तिमत्वांचा समावेश करण्यात आला होता. हे गाणे खूप गाजले होते.

त्यात क्रिकेट विविध क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्वांचा समावेश करण्यात आला, पण देशात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरसह एकाही क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला नाही.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "'फिर मिले सूर' मध्ये आता सचिनचाही समावेश"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner