चीनने बंद केली हॅकिंग साईट!

Posted on Tuesday, February 09, 2010 by maaybhumi desk

शांघाय
एखादी साईट कशी हॅक करावी याचे धडे देणारी साईट चीनने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी चीन सरकारने साईटच्या तीन कर्मचाऱ्यांनाही अटक केली आहे.

ब्लॅक हॅक सेफ्टीनेट असे या साईटचे नाव असून, 12 हजारांवर ग्राहक या साईटला भेट देत असत. या माध्यमातून हॅकिंगचे धडे या साईटला भेट देणाऱ्यांना देण्यात येत.

चीनमध्ये मागील अनेक दिवसांपासून हॅकिंगच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनचे नाव खराब झाला आहे. गूगल सारख्या प्रसिद्ध सर्च इंजिनने तर चीन मधील आपला व्यवसाय गुंडाळण्याची धमकीही दिली होती.

भारतीय लष्करातूनही मोठ्या प्रमाणावर माहिती चोरण्याचा प्रयत्न काही चिनी हॅकर्सने केला होता. ब्रिटन सरकारलाही अशाच प्रकारचा अनुभव आला होता.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "चीनने बंद केली हॅकिंग साईट!"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner