अभिषेक 'बाप से बेटा सवाई'
अभिषेक बच्चनसाठी २०१० या वर्षाची सुरवात जोरदार झाली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्याने छोट्या पडद्यावर केलेले आगमन भलतंच फळलंय. तो सूत्रसंचालक असलेल्या नॅशनल बिंगो नाईट या शोच्या पहिल्या भागाचे 'टिआरपी'चे आकडे बाहेर आले असून अभिषेक 'बाप से बेटा सवाई' ठरला आहे.
या शोच्या पहिल्या भागाता ५.१ असा टिआरपी मिळाला आहे. अमिताभ बच्चन यांच्यासह शाहरूख खान, सलमान खान, अक्षय कुमार ही बडी स्टार मंडळींनाही त्याने मागे टाकली आहेत. या मंडळींच्या पहिल्या शोला इतकाही टिआरपी लाभलेला नाही. दुसर्या भागात हा टिआरपी घसरला असला तरी इतर स्पर्धकांच्या तुलनेत ती कामगिरीही उजवी म्हणावी लागेल.
या यशाने अभिषेक तर सुखावलाच आहे, पण मुलाची गाडी टेलिव्हिजनवरही मार्गी लागल्याने 'बिग बी'लाही विशेष आनंद झाला आहे. अभिषेकने आपल्या ब्लॉगवर आनंद जाहीर केला आहे. मात्र या यशाने आपण हुरळून गेलेलो नाही असेही सांगितले आहे. कारण ही फक्त सुरवात आहे, याची त्याला कल्पना आहे.
No Response to "अभिषेक 'बाप से बेटा सवाई'"
Post a Comment