अमिताभ-आमीर एकत्र येण्याची शक्यता
Posted on Tuesday, February 09, 2010 by maaybhumi desk
मुंबई
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि मि. परफेक्शनिस्ट आमीर खान नजिकच्या काळात एकत्र येण्याची शक्यता आहे. खुद्द आमीरनेच आपण बिग बी बरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनाच सांगितले आहे.त्यावर अमिताभ यांनी त्याला तूच हा चित्रपट काढ नी दिग्दर्शित कर असा सल्लाही देऊन टाकला.
खुद्द अमिताभ यांनीच ही 'बातमी' आपल्या ब्लॉगवर दिली आहे. आमीरचे वडिल व ज्येष्ठ निर्माते ताहिर हुसैन यांचे नुकतेच निधन झाले. या दुःखात आमीरचे सांत्वन करण्यासाठी बच्चन कुटुंबिय आमीरच्या घरी गेले होते. 'आम्ही तिथे गेल्यानंतर तेथील गंभीर वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला. तो काळ छान गेला. आम्ही निघालो तेव्हा निरोप देण्यासाठी खुद्द आमीर गेटवर आला होता. त्यावेळी सर तुमच्याबरोबर काम करण्याची माझी इच्छा आहे, असे त्याने बोलून दाखवले. मग मीही त्याला सांगितले की तूच इतका प्रतिभावंत आहेत. मग तूच हा चित्रपट दिग्दर्शित कर. त्यावर त्यानेही संमतीदर्शक मान डोलावली, असे अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "अमिताभ-आमीर एकत्र येण्याची शक्यता"
Post a Comment