तेलंगाणाप्रश्नी केंद्राकडून विश्वासघात- टिआरएस

Posted on Friday, February 12, 2010 by maaybhumi desk

click hereहैदराबाद
आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगाणा स्वतंत्र राज्य करण्यासंदर्भात केंद्र सरकारने नेलेली समिती हा विश्वासघात असल्याची संभावना तेलंगाणा राष्ट्र समितीचे (टिआरएस) अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे. या विश्वासघाताच्या निषेधार्थ पक्षाच्या खासदार, आमदारांनी राजीनामे द्यावेत असे त्यांनी आदेश दिले आहेत.

केंद्राने पुन्हा एकदा आमच्याशी कपट केले अशी समितीची भावना आहे. तेलंगाणासंदर्भात केंद्राने नेमलेल्या न्या. श्रीकृष्ण समितीशी चर्चा करण्यासाठी राव यांनी आपत्कालीन बैठक बोलवली आहे. त्यात पुढे काय करायचे ते ठरविले जाणार आहे. कॉंग्रेसचे आमदारही आज श्रीकृष्ण समितीच्या अनुषंगाने बैठक घेणार आहेत.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "तेलंगाणाप्रश्नी केंद्राकडून विश्वासघात- टिआरएस"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner