मेघालयात चार मुख्‍यमंत्री

Posted on Monday, February 01, 2010 by maaybhumi desk

शिलांग
सरकार वाचवण्‍यासाठी राजकीय पक्ष कुठल्‍याही थराला जाऊ शकतात. मग त्‍यासाठी एका राज्यात चार मुख्यमंत्री बनवावे लागले तर त्यामुळे काय फरक पडतो. भारतीय राजकारणात सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्‍या कॉंग्रेसनेही मेघालयमध्‍ये तेच केले आहे. राज्‍यात सध्‍या म्हटलं तर ज्‍येष्ठ कॉंग्रेस नेते डी.डी. लपांग मुख्यमंत्री आहेत.

मात्र आता त्‍यात प्रदेश कॉंग्रेसाध्यक्ष आणि उप मुख्यमंत्री फ्रायडे लिंगदोह यांनाही मुख्यमंत्री पदाचा दर्जा देण्‍यात आला आहे. आधीपासूनच लपांग यांच्‍या व्‍यतिरिक्त दोन मुख्‍यमंत्री आहेत.

यापूर्वी राज्य योजना आयोगाचे अध्यक्ष दोंकुपर रॉय आणि मेघालय आर्थिक विकास परिषदेचे प्रमुख जे. डी. रिम्बई यांनाही मुख्यमंत्र्याचा दर्जा देण्‍यात आला आहे. त्यामुळे आता राज्यात चार मुख्‍यमंत्री झाले आहेत.
लिंगदोह यांना पदोन्नती देऊन मुख्यमंत्री बनविण्‍याची अधिसूचना गेल्‍या गुरूवारी प्रसारित करण्‍यात आली होती. त्‍यानुसार लिंगदोह यांचा दर्जा आणि पद उपमुख्यमंत्रीपदावरून वाढवून मुख्यमंत्री करण्‍यात आले आहे. ते मुख्यमंत्र्याचे राजकीय सल्‍लागार असतील.


लिंगदोह यांच्‍या पदोन्नतीमागे कॉंग्रेसमध्‍ये असलेली धुसफूस आणि गटबाजी कारणीभूत आहे. लिंगडोह यांना आठ आमदारांचा पाठिंबा असून ते बंडखोरीच्‍या तयारीत होते. त्यामुळे पक्षश्रेष्‍ठींनी ही भूमिका घेतली आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "मेघालयात चार मुख्‍यमंत्री"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner